नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट आले आहेत. अमित शाह यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खुद्द अमित शाह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 'मी देवाचे आभार मानतो. या काळात ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि माझ्या तसंच माझ्या कुटुंबाला धीर दिला, त्यांचेही मी आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता मी पुढचे काही दिवस होम क्वारंटाईन होणार आहे,' असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाशी लढण्यात मदत करणारे आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या मेदांता हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचेही मी आभार मानतो, असंही अमित शाह म्हणाले आहेत. 




२ ऑगस्टला आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली, तरी अमित शाह यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. पण खबरदारीचा उपाय म्हणून अमित शाह मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. 


९ ऑगस्ट रोजी अमित शाह कोरोनातून मुक्त झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भाजप नेते मनोज तिवारी यांनीही याबाबत ट्विट केलं होतं, पण यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं तेव्हा समोर आलं होतं. आता मात्र खुद्द अमित शाह यांनीच आपण कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं आहे.