नवी दिल्ली : हवाईदलाचं AN-32 विमान हे 3 जून रोजी बेपत्ता झाले होते. या घटनेला आठवडा उलटूनही याचा शोध लागला नव्हता. भारतीय वायु सेना या विमानाच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण विेमानाशी काही संपर्क होत नव्हता. आता या संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अरुणाचलच्या लिपो येथे एएन 32 विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 13 प्रवासी दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एन 32 यामध्ये विमानात 8 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवासी होते. ते विमान अपघातात दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


2016 मध्येही विमान बेपत्ता 


2016 मध्ये चेन्नई येथून पोर्ट ब्लेयरला जाणारं  AN-32 विमान बेपत्ता झालं होतं. यामध्ये एकूण 12 जवान, 6 क्रू-मेंबर, 1 नौसैनिक, 1 लष्कराचा जवान आणि एकाच परिवारातील 8 सदस्य होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी 1 पानबुडी, आठ विमानं आणि जहाज लावण्यात आली होती. हे विमान अजूनही सापडलं नाही. या विमानाची काहीच माहिती हाती लागली नाही.


AN-32 विमान


Antonov-32 या मिलिट्री ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टमध्ये 2 इंजिन असतात. हे विमान 55°C पेक्षा अधिकच्या तापमानात ही 'टेक ऑफ' करु शकतो. हे विमान 14, 800 फूट उंचीवर उडू शकतं. विमानात पायलट, को-पायलट, गनर, नेविगेटर आणि इंजीनियरसह 5 क्रू-मेंबर असतात. 50 लोकं यामध्ये बसू शकतात. AN-32 हे भारतीय वायुसेनेचं मध्यम श्रेणीचं सेवा देणारं विमान आहे. भारतीय वायुसेनेकडे सध्या अशी 100 विमानं आहेत. जे ट्रांसपोर्टचं काम करतात. जगात जवळपास 240 विमान आहेत. भारतीय वायुसेने शिवाय श्रीलंका, अंगोला आणि यूक्रेनच्या वायुसेनेकडे हे विमानं आहेत.