गंगटोक : पूर्व सिक्कीममध्ये एक मोठा अपघात झाला. जवानांना घेवून जाणारा एक ट्रक 600 फूट खोल दरीत कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जवाण शहीद तर तीन जवाण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर घडली आहे. त्यामुळे परिसरात एकचं खळबळ मजली आहे. हा मार्ग गंगटोकला भारत-चीन सीमेजवळील सोमगो लेक आणि नाथुलाला जोडत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकमध्ये कुमाऊं रेजिमेंटेचे 6 जवान होते. ट्रेक गंगटोकच्या दिशेने जात असताना वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. वाहनचालक आणि 2 जवान जागीच शहीद झाले.  तर  इतर तीन जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


सेना, बीआरओ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून या दुर्गम क्षेत्रात बचाव अभियान राबविले आणि तीन जखमी सैनिकांना गंगटोकच्या आर्मी रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथून तिन्ही जवानांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.