`रात्री 1 वाजता माझ्या सूनेच्या बेडरुममध्ये....,` महिलेचा पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; शूट केला VIDEO
उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथील पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस अधिकारी जबरदस्ती घरात घुसून, झडती घेऊ लागला असा महिलेचा आरोप आहे. यादरम्यान महिलेने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे पोलिसांच्या कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना घडली आहे. एका महिलेने पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने घरात घुसून जबरदस्ती झडती घेतल्याचा महिलेचा आरोप आहे. यादरम्यान, महिलेने मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला आहे. महिला व्हिडीओ शूट करणं सुरु असता अधिकाऱ्याने तिला धमकावलं. यानंतर आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवत त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोतवालीच्या गांधीनगरमधील आहे. आरोप आहे की, रात्री नवी बस्ती चौकीचे प्रभारी नवाब सिंह रात्री उशिरा 1 वाजता महिलेच्या खोलीत जबरदस्ती घुसले. पोलीस अधिकारी जबरदस्ती रुममध्ये घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेच्या सासूने बाहेरुन कडी लावत दरवाजा लॉक केला. यानंतर तिने व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी दोन कॉन्स्टेबलला बोलावून घेतलं.
'खाकीचा धाक दाखवत धमकी'
सहकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांना दरवाजा उघडण्यास सांगितलं. यानंतर महिलेने आपल्या नातेवाईकांनाही घटनास्थळी बोलावलं होतं. यादरम्यान, अधिकारी खाकीचा धाक दाखवत घटनास्थळावरुन फरार झाला. तसंच इतर दोन पोलीस कर्मचारीही महिला आणि तिच्या नातेवाईकांचा व्हिडीओ शूट करत तपासाबद्दल सांगू लागले.
'आरोपी अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी'
याप्रकरणी पीडित वयस्कर महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. महिलेने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला पोलीस अधिकारी नवाब सिंहचा व्हिडीओ पोलीस अधिक्षकांनी दाखवला आणि कडक कारवाईची मागणी केली. पोलीस अधिक्षकांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.
तपासानंतर केली जाणार कारवाई
सीओ सदर अभय नारायण यांनी सांगितलं आहे की, पीडित महिलेची तक्रार मिळाली आहे. त्यांनी एक व्हिडीओही दिला आहे. या व्हिडीओचा तपास करण्यासाठी एक टीम गठीत करण्यात आली आहे. तपासानंतर सत्य समोर येईल आणि त्याच्या आधारे कारवाई केली जाईल.