नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात थोडी नैराश्या आली तरी आपण खचून जातो. कधी कधी टोकाचा निर्णयही उचलण्याचा विचार मनात येतो. मात्र या व्यक्तीकडून एक सकारात्मक उर्जा प्रत्येकानं घ्यायला हवी. दोन्ही हात आणि पाय नसतानाही आपली जिद्द सोडली नाही. मन खचलं नाही. तो स्वत: स्कूटर चालवण्यासाठी धडपड करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीची धडपड आणि त्याने दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकून तुम्ही भरावनू जालं. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जेव्हा आनंद महिंद्रा यांनी पाहिला तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं त्यांनी या तरुणाचे कष्ट आणि मेहनत पाहून त्याला नोकरीची ऑफर दिली आहे. 


या अपंग व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून जात असताना एकाने या व्यक्तीचा व्हिडीओ काढला. त्यामध्ये या अपंग व्यक्तीनं आपण हात पाय नसतानाही गाडी कशी चालवतो या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.


या व्यक्तीच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन लहान मुलं आणि वृद्ध वडील आहेत. उदरनिर्वाहासाठी त्याला बाहेर जावं लागतं. गेल्या 5 वर्षांपासून तो ही गाडी चालवत असल्याचं त्याने सांगितलं आहे. 


या अपंग व्यक्तीचा व्हिडीओ आनंद महिद्रांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ किती जुना आहे आणि कुठला आहे याबाबत मला माहीत नाही. पण या व्यक्तीला पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. तो अपंग आहे मात्र याचं दु:ख न करता जिद्द मनात ठेवून तो आपल्याला शक्य होईल तसं काम करत आहे. असं आनंद महिंद्रा म्हणाले.


आनंद महिंद्रा यांनी  महिंद्रा लॉजिस्टिकला टॅग करून तुम्ही लास्ट माईल डिलिव्हरीसाठी बिझनेस असोसिएट म्हणून काम करू शकता का? असं प्रश्न विचारला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 30 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.