Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावी फेल सिनेमा पाहिल्यानंतर मी चहुकडे पाहिले आणि आपल्या इथल्या कठीण परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी बोललो. यामध्ये एक आयआयटी पदवीधर होता. ज्याचा एक बिझनेस स्टार्टअपदेखील होता. तरीही त्याने यूपीएससी परीक्षादेखील दिली होती. यूपीएससी ही आयआयटीसारखीच कठीण आहे, असे तो म्हणाले. हीच सर्वसाधारण धारणा असेल तर आपल्याला रॅंकींग बदलण्याची गरज असल्याचे मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले. 


ग्लोबल रॅंकींगमध्ये बदल होण्याची गरज आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली. एका विद्यार्थ्याशी बोलल्यावर मला असे वाटते की ग्लोबल रॅंकींगमध्ये बदल व्हायला हवा. जगातील सर्वात कठीण 10 परीक्षांबद्दल आनंद महिंद्रा बोलले. यामध्ये भारतातील 3 परीक्षांचा समावेश त्यांनी केला. यामध्येआयआयटी जेईई नंबर 2 वर, यूपीएससी नंबर 3 वर तर गेट परीक्षा नंबर 8 वर होती. मला जो फिडबॅक मिळाला त्यानुसार वर्ल्ड रॅंकिंग अपडेट करायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 


आनंद महिंद्रा यांनी बारावी फेल सिनेमाचा उल्लेख यावेळी केला. सिनेप्रेमींमध्ये हा चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची कहाणी सांगण्यात आली आहे. जे अत्यंत गरीब परिस्थितीत असूनही देशसेवा करु इच्छित होते. बारावी नापास होऊन देखील त्यांना ध्येय गाठायचे होते. यामध्ये विक्रांत मेस्सीने प्रमुख भूमिका केली आहे. या सिनेमाला बेस्ट फिल्मचा फिल्मफेयर मिळाला आहे. डायरेक्टर विधू विनोद चोप्रा यांना सिनेमासाठी बेस्ट डायरेक्टरचा फिल्मफेयर मिळाला. 



नेटीजन्समध्ये वाद-विवाद 


आनंद महिंद्रा यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियातील तरुणांमध्ये वादविवाद सुरु झाले आहेत. नेटिझन्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा असल्याचे मत काहीजण व्यक्त करत आहेत. तर आयआयटी जेईई ही सर्वात कठीण परीक्षा असल्याचे काहींचे मत आहे. आनंद महिंद्रांच्या या पोस्टला 4 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.