Anand Mahindra Tweet Trekking: आनंद महिंद्रा अनेकदा आपल्या ट्वीटसाठी लोकप्रिय असतात. सोशल मीडियावर ते अनेकदा फेमस असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे अनेक जण ट्रेकिंगाला फिरायला जात आहेत. तेव्हा अशीच एक इच्छा आनंद महिंद्रा यांनीही व्यक्त केल्याची दिसून येते आहे. यावेळी त्यांनी असेच एक ट्विट केले आहे. जे पाहून तुम्हालाही वाटेल की खरंच या साईटवर आपणही जायला हवे. त्यातून येथे ट्रेकिंगला जाण्यसाठी इच्छा खुद्द आनंद महिंद्रांनीही व्यक्त करून दाखवली आहे. सध्या त्यांचे हे ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तुम्हालाही या जागेबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल यात काहीच शंका नाही. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की आनंद महिंद्रा नक्की कोणत्या ट्रेकिंग स्पॉटबद्दल बोलत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर म्हटल्याप्रमाणे सध्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे आपल्यालाही कुठे ना कुठे तरी ट्रेकिंगला जाणं हे भागच आहे. आपल्या मित्रमैत्रीणींसोबत आपणही कुठे ट्रेकिंगला जावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आनंद महिंद्रांनीही अशाच एका जबरदस्त ठिकाणी किंवा खतरनाक ठिकाणी फिरायला जायची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. पावसाळ्यात तुम्हीही कुठे ट्रेक प्लॅन करणार असालच तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचे धाडस करू शकाल का? सध्या आनंद महिंद्रा यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्सही केल्या आहेत. सर्वांनीच यावर नानाविध प्रतिक्रियाही दर्शवल्या आहेत. त्यामुळे सध्या या ट्विटची सर्वत्र तूफान चर्चा आहे. चला तर मग पाहुया नक्की काय ट्विट केलंय आनंद महिंद्रा यांनी. 


हेही वाचा - लव्ह बर्ड्स दिसले पुन्हा एकत्र; चेहरा लपवतं अनन्या दिसली अन् आदित्य मात्र...


आनंद महिंद्रा यांनी यावेळी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ''मी कबूल करतो की मला या ठिकाणाविषयी काहीच माहिती नव्हती. मी या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे. मी आव्हानासाठी तयार आहे की नाही? हे मात्र शोधून काढावे लागेल! कलावंतीण दुर्गच्या माथ्यापर्यंतचा ट्रेक हा पश्चिम घाटातील सर्वात कठीण ट्रेक मानला जातो. जवळजवळ 60 अंशांची ही झुकलेला कडा आहे.''



या व्हिडीओत एक पर्यटक हा कलावंतीण दुर्गावरील पायऱ्या चढताना दिसत आहे. यावेळी हा व्हिडीओ GoPro वर शूट करण्यात आला आहे. ट्विटवर या व्हिडीओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.