मुंबई : हरियाणाच्या जींदमध्ये तुटलेल्या चप्पल, बूट सुस्थितीत करणाऱ्या नरसी राम पहिल्यांदा चर्चेत आला तो उद्योगपती आनंद महिंद्रा केलेल्या एका ट्विटनंतर... 'जखमी बुटांचा डॉक्टर' असा आपल्या बॅनरवर उल्लेख करणारे बुटांचे डॉ. नरसीराम यांनी आनंद महिंद्रा यांचं लक्ष वेधून घेतलं होतं... याच 'बुटांच्या डॉक्टर'साठी महिंद्रा यांनी आता एक नवं 'हॉस्पीटल' उभारून दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी कुणीतरी व्हॉटसअपवर एक फोटो पाठवला होता. तो फोटो होता हरियाणातील जींदच्या पटियाला चौकात चप्पल-बूट ठिक करणाऱ्या नरसीराम यांचा... लोकांच लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी बॅनर लावला होता. एखाद्या हॉस्पीटलप्रमाणे नरसीराम यांच्या बॅनरवर लंच टाइमपासून सर्व माहिती लिहिलेली होती. आमच्या इथे सर्व प्रकारची बूट जर्मन पद्धतीने ठिक करून मिळतील, असंही त्याखाली लिहिलं होतं.


सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तिकडून मॅनजमेंटच्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटचे गुण शिकायला हवेत, असं म्हटलं होतं. आनंद महिंद्रा या मोचीपासून खूप प्रभावीत झालेले दिसत होते. त्यांनी आपल्याला या कल्पनेत गुंतवणूक करण्याचंही म्हटलं... मात्र, नरसीराम यांनी महिंद्राच्या टीमकडे पैशांची मागणी न करता अत्यंत नम्रपणे  काम करण्यासाठी चांगली जागा हवी असल्याचं सांगितलं.


त्यानंतर आता महिंद्र यांनी आपला शब्द पाळत नरसीराम यांना एक आधुनिक 'कियॉस्क' उभारून दिलंय. सोशल मीडियावर या चालत्या-फिरत्या हॉस्पीटलचा व्हिडिओ शेअर करत, लवकरच हा त्याच्या मालकाच्या स्वाधीन केला जाईल, असं महिंद्रा यांनी म्हटलंय.