आनंद महिंद्रा `e-mobility`चा व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, `ई म्हणजे...`
महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
Anand Mahindra's Tweet: महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर ते दररोज रोजच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी ट्वीट करत असतात. त्यांनी एखादं ट्वीट करताच त्याखाली प्रतिक्रिया देण्यासाठी नेटकऱ्यांची चढाओढ लागते. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला व्हिडीओ आतापर्यंत 1.2 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी म्हणजेच 12 लाख वेळा पाहिला गेला आहे आणि 27 हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनी त्याला लाईक केले आहे. आता तुम्हीही विचार कराल की, या व्हिडीओमध्ये असे काय आहे की इतके लोक बघत आहेत आणि लाईक करत आहेत. चला तर मग या व्हिडीओबद्दल जाणून घेऊयात
आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये चार मुले डायनिंग टेबलवर बसून जेवत आहेत. पण हे काही सामान्य डायनिंग टेबल नाही. हे एक चालतं फिरतं डायनिंग टेबल आहे. ज्यावर बसून चार मुले जेवत असल्याचं दिसत आहे. तसेच कार वजा डायनिंग टेबल असलेली गाडी इंधन रिफिलिंग पंपावर पोहोचली आणि इंधन भरले. यानंतर जेवण करत ते पुढे निघून गेले. या डायनिंग टेबलच्या खाली चाके बसवण्यात आली आहेत. तेसच एक इंजिनही बसवण्यात आले होते. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करून लिहिले, "मला वाटते की ही ई-मोबिलिटी आहे. जिथे 'ई' म्हणजे ईट..."
देशात ई-मोबिलिटीवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. सर्व वाहन निर्माते ई-मोबिलिटीवर काम करत आहेत. महिंद्रा लवकरच अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आखत आहे. सर्व प्रथम XUV 300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केले जाऊ शकते. तथापि, लाँचच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.