Anand Mahindra Tweet: 'केसरिया तेरा इश्क है पिया' गाण्याची (kesariya song) मोठी क्रेझ पहायला मिळते. रणबीर आणि आलियाची लव केमिस्ट्री या गाण्यातून समोर आली होती. अशातच हे गाणं पुन्हा एकदा चर्चचा विषय आहे. त्याला कारण ठरतंय, गायक स्नेहदीप सिंग (Snehdeep Singh Kalsi). स्नेहदीप सिंगने हे गाणे 5 भाषांमध्ये गायलं आहे. त्यामुळे सध्या या गाण्याची इंटरनेटवर तुफान (Viral Video) चर्चा होताना दिसत आहे. (Anand Mahindra Tweet Share Video of Snehdeep Singh Kalsi sing kesariya song)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहदीपने (Snehdeep Singh Kesariya Song) हे गाणे मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये गायले आहे. हा व्हिडिओ खूप पाहिला जातोय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही स्नेहदीपचं कौतुक केलंय. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय आहे. अशातच आता सोशल मीडियावर अनेकदा अॅक्टिव राहणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी देखील व्हिडिओ (Anand Mahindra Share Video) शेअर करत स्नेहदीप सिंग यांचं तोंडभरून कौतूक केलंय.


काय म्हणाले Anand Mahindra?


स्नेहदीप सिंग याच्याकडे खरोखरच भाषा कौशल्य आहे. त्याने ही विविध भाषेची परीक्षा उत्तीर्ण केली. पुन्हा एकदा, एका ध्रुवीकृत जगात, एकरूप होणारे आवाज ऐकणं खूप सांत्वनदायक आहे, असं आनंद महिंद्रा (Anand mahindra twitter On Snehdeep Singh) म्हणाले आहेत.


पाहा Tweet -



दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्नेहदीप सिंग एफएम रेडिओच्या स्टुडिओमध्ये दिसत आहे. त्याचा व्हिडिओ शेअर केल्याने स्नेहदीप सिंगचा आवाज अनेकांपर्यंत पोहचत आहे. आनंद महिंद्रा वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरून (Social Media) शेअर करत असतात. विविध माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.