Anand Mahindra : सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पानांचं कौतुक कर त त्या संकल्पना देशाला आधुनिकीकरणाच्या वाटेवर नेण्यास नेमकी कशी मदत करत आहे हे आनंद महिंद्रा यांनी कायमच सोप्या शब्दांत सर्वांपुढे मांडलं. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या X वरील पोस्टच्या माध्यमातून सर्वांनाच थक्क करणारी दृश्य समोर आणली. जिथं एका राष्ट्रीय महामार्गाचं सुरेख रुप त्यांनी सर्वांसमोर आणलं. महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 चा एक भाग सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिंद्रा यांनी शेअर केलेला हा फोटो मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पारून जाणाऱ्या रस्त्याचा असून, दोन फोटोंच्या माध्यमातून या कमाल रस्त्याचे पाहता येत आहे. जिथं एकिकडे गर्द झाडीतून जाणारा रस्ता दिसत आहे. तर, दुसरीकडे त्याच रस्त्याच्या खाली वाघ आणि तत्सम वन्य जीव सावलीत विसावा घेताना, त्या रस्त्याखालून ये- जा करताना दिसत आहेत. या महामार्गाची बांधणीच वन्यजीवांचा येथील वावर लक्षात घेऊन केली आहे आणि त्याचा फायदही होताना दिसत आहे, असंही महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Anand Mahindra share post Featuring Elevated Part Of Nh44 Through Pench Tiger Reserve)



महिंद्रा यांनी पेंच राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या महामार्गाचा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टचं बरंच कौतुक झालं. त्यांचे विचार पुन्हा एकदा अनेकांना पटले. काहींनी तर हा महामार्ग कुठंय आणि तो कुठपर्यंत जातो याची माहितीही शोधण्य़ाचा प्रयत्न केला. 


तुम्हालाही या राष्ट्रीय महामार्गाबद्दल कुतूहल आहे का? 


मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील सिवनी जिल्ह्यात बांधण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग देशातील पहिला साऊंड प्रूफ महामार्ग आहे. NHAI अंतर्गत त्याची बांधणी करण्यात आली असून, पेंच व्याघ्रप्रकल्पातील बफर झोनवरून हा राष्ट्रीय महामार्ग पुढे जातो. 



राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 चा भाग असणारा हा रस्ता 29 किमी अंतराचा असून, त्याचा 21.69 किमी भाग भूपृष्ठापासून वरच्या बाजूस आहे. अंडरपास आणि चारपदरी वाहतुकीची व्यवस्था असणाऱ्या या महामार्गावरील वाहतूक, वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश याची कोणत्याही प्रकारची अडचण येथील वन्यजीवांना होत नाही. शिवाय वन्य प्राणी समोर आल्यास त्याची माहिती इथं असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रण कक्षापर्यंत सातत्यानं पोहोचत असते. त्यामुळं मध्य प्रदेशातून पेंच सिवनी मार्गे पुढचा प्रवास करायचा असेल तर या मार्गावरून जाण्यालाच अनेकजण प्राधान्य देताना दिसतात.