Elephant Alcohol Addiction: तुम्ही आतापर्यंत दारुचं व्यसन लागलेल्या माणसाबद्दलचे अनेक किस्से ऐकले असतील. मात्र एखाद्या हत्तीला दारुचं व्यसन लागल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? आता हत्तीसारख्या एवढ्या अवाढव्य प्राण्याला दारुचं व्यसन लागल्यावर काय होणार? याचा विचार तुम्ही करुच शकता. मात्र मुळात हत्तीला दारुचं व्यसन कसं लागलं? असा प्रश्नही तुम्हाला पडला असणार. तर या साऱ्या प्रश्नांची उत्तर दारुचं व्यसन लागलेला हत्ती हा किस्सा सांगताना हत्तीशी संवाद साधणारा अवलिया अशी ओळख असलेल्या एलिफंट विप्सरर आनंद शिंदे यांनी हा सांगितला आहे.


हत्तीबद्दलची रंजक माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर मंजिरी पुराणिक यांनी 'सर्व काही' या युट्यूब चॅनेलवर घेतलेल्या मुलाखतीमध्ये आनंद शिंदे बोलत होते. आनंद शिंदे हे ट्रंकॉल फाउंडेशनच्या माध्यमातून हत्तींचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम करतात. त्यांनी हत्तांसंदर्भातील अनेक रजंक गोष्टी या मुलाखतीमध्ये सांगितल्या. ज्यामध्ये हत्ती स्वत:ला एकमेकांच्या नावाने हाक मारतात इथपासून ते हत्ती आणि तिच्या बाळांचं एकत्र राहणं किती महत्त्वाचं असतं याबद्दल आनंद शिंदे यांनी अगदी उदाहरणांसहीत माहिती दिली. त्यांनी हत्तीसंदर्भातील रंजक गोष्टी सांगताना एका हत्तीला दारुचं व्यसन लागलं होतं आणि पुढे त्या हत्तीचं काय झालं याबद्दलचाही रंजक किस्सा कथन केला.


भारतात नेमका कुठे घडला हा प्रकार? हत्तीला दारुचं व्यसन कसं लागलं?


आनंद शिंदेंच्या सांगण्यांनुसार, दारुचं व्यसन लागलेला हत्ती केरळमधील कोल्लम जिल्ह्यात होता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हत्तीला दारुचं व्यसन कसं लागलं. तर या हत्तीची काळजी घेणाऱ्या महुताने हत्तीला पाण्यामधून हळूहळू दारु देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ठराविक वेळेला हत्तीला दारु मिळाली नाही तर तो हिंसक व्हायचा. "एका माणसाने मजा म्हणून हत्तीच्या पाण्यात बुचभर दारू हत्तीच्या पाण्याच्या बादलीत टाकली. नंतर त्याने ते प्रमाण वाढवलं. मग त्या हत्तीला याची सवय झाली. मात्र एक दिवस त्याने हत्तीला दारु दिली नाही. मग त्या हत्तीने त्याचे घरदार, बॅकयार्ड सगळं उद्धवस्त करुन टाकलं," असं आनंद शिंदेंनी या हत्तीला दारुचं व्यसन कसं लागलं यासंदर्भातील किस्सा कथन करता सांगितलं. पुढे या हत्तीचं काय झालं याबद्दलही त्यांनी तपशील दिला.


नक्की वाचा >> 4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...


पुढे काय झालं?


"हत्तीला दारुचं व्यसन लागल्याची गोष्ट वनखात्याच्या लक्षात आली. वनखात्याला कल्पना नसताना हा व्यक्ती हत्तीला गुपचूप दारु देत होता. हत्तीने नासधूस केल्यानंतर प्रकरण समोर आल्यावर या व्यक्तीला अटक करण्यात आली. हत्तीला एलिफंट सेंटरमध्ये पाठवलं," असं आनंद शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये आल्यावरही हत्तीला संध्याकाळी सात वाजता दारुची तल्लफ लागल्याने प्रमाणे तो वागण्यामधून आता मद्य हवं असं दर्शवायचा. "संध्याकाळी सात झाले की तो एक टक एका दिशेला बघत शांतपणे उभा राहायचा," असं आनंद शिंदे म्हणाले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sarva Kaahi (@sarvakaahi)


अशी सोडवली दारु...


विशेष म्हणजे या हत्तीची दारु आनंद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे सोडवली. "त्याने जो चढता क्रम लावला. तो आम्ही उतरता क्रम लावला. सहा महिने लागले पण हत्तीची दारु सुटली," असं आनंद शिंदेंनी सांगितलं.