21 एलीट शेफ, 2500 डिश, रात्री 4 वाजताही जेवणाची व्यवस्था! अंबानींचा प्री वेडिंग मेन्यू पाहा
Radhika Merchant Anant Ambani pre wedding : प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा मुलगा अनंत अंबानी लग्न बंधनात अडकणार आहे.
Radhika Merchant Anant Ambani pre wedding News In Marathi: मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अंबानीची जोरदार तयारी सुरु आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान या दोघांची प्री-वेडिंग पार्टीही होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी देश-विदेशातील 1000 लोक उपस्थित राहतील. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आंतरराष्ट्रीय नेते आणि अनेक सेलिब्रिटी भारतात येणार आहेत. त्यामुळे ग्रँड इव्हेंटचा फूड मेनूही खास असेल.
सेलिब्रिटींची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी भारत आणि विदेशातील अंदाजे 1000 लोक सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय नेते आणि सेलिब्रिटी अनंत-राधिकला आशीर्वाद देणार आहेत. शाही मेजवानीचा फूड मेनू खूप खास असेल. कार्यक्रमासाठी काम करणाऱ्या हॉस्पिटॅलिटी टीमच्या अपेक्षेनुसार या लग्नातील जेवणाबाबत पाहुण्यांच्या पसंतीनुसार विशेष काळजी घेतली जाईल.
प्री-वेडिंग पार्टी
या कार्यक्रमातील जेवणाबाबत आवडी निवडीचा विचार करून ज्या गोष्टी खाल्ल्या जाणार नाहीत त्या गोष्टी टाळल्या जाणार आहेत. त्यामुळे टीमने प्री-वेडिंग सेलिब्रेशनला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांकडून त्यांच्या खाद्यपदार्थांच्या निवडीबाबत माहिती मागवली आहे. प्रत्येक पाहुण्यांच्या आहारविषयक या कार्यक्रमात काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्री-वेडिंग फंक्शनसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जात आहे.. पाहुण्यांसाठी तीन दिवसांत 2500 प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जाणार आहेत. तर यासाठी 25 शेफची विशेष टीम काम करणार आहे.
25 शेफचू टीम जामनगरला येणार
रिपोर्ट्सनुसार, प्री वेडिंगच्या कार्यक्रमासाठी इंदूरवरुन साधारण 25 शेफची खास टीम येणार आहे. या फंक्शनमध्ये भारतीय शैलीतील खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाते. याशिवाय पारसी, थाई फूड, मेक्सिकन आणि जपानी खाद्यपदार्थही फंक्शन्ससाठी तयार करणार आहेत. पॅन एशिया पॅलेटवर फोकस असणार आहे. पाहुण्यांसाठी तीन दिवसांत 2500 प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जाणार आहेत. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि मध्यरात्री स्नॅक्सचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाश्त्याच्या मेनूमध्ये 70 पर्याय असतील. पाहुण्यांना दुपारच्या जेवणासाठी 250 प्रकारचे खाद्यपदार्थ आणि रात्रीच्या जेवणासाठी 250 प्रकारचे खाद्यपदार्थ चाखता येणार आहेत.
पार्टीसाठी जागतिक नेते येतील
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा साखरपुडा जानेवारी 2023 पार पडला. आता त्यांचे लग्न एकदम ग्रँड असणार आहे. या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसारख्या अनेक बड्या व्यक्तींचा त्यात समावेश असतो. मार्क झुकेरबर्ग, बिल गेट्स, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, रजनीकांत इत्यादी अनेक सेलिब्रेटी हे चढाईसाठी हजेरी लावणारे आहेत. तसेच रिहाना, अरिजित सिंग आणि दिलजीत दोसांझ प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होणार आहेत.