अखेर अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, `या` दिवशी अडकणार लग्नबंधनात
Anant and Radhika Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे लग्न होणार आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. आता यावर्षी अनंत आणि राधिकाचे लग्न होणार आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding News In Marathi : भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी अनेकदा चर्चेत असतो. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनाच अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जुलैमध्ये मुंबईत विवाहबद्ध होणार असून त्याआधी 1 ते 3 मार्च या कालावधीत जामनगर येथील रिलायन्स ग्रीन कॉम्प्लेक्समध्ये अनेक विवाही संबंधीत कार्यक्रम होणार असून भारत-विदेशातील व्यावसायिक आणि तंत्रज्ञान जगतातील अनेक नामवंत व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
19 जानेवारी 2023 ला अंबानींच्या अँटिलिया घरी राधिका मर्चंट आणि अनंतचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील तसेच क्षेत्रातील मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून चाहत्यांना अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाची प्रतिक्षा होती. आता लवकरच त्यांच्या घरी सनई चौघडे वाजणार असून ते विवाह बंधनात अडकणार आहेत. 12 जुलै 2024 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या लगन लखवानु या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शला सुरुवात झाली आहे. नुकतचं गुजरात येथील जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचा लगन लखवानु हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान अलीकडेच 16 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील जामनगर येथील अंबानी कुटुंबाच्या इस्टेटमध्ये वधू-वर लग्न लखवानू कार्यक्रम पार पडला. यामध्ये प्रथम देवतांना आणि नंतर जवळच्या कुटुंबीयांना अर्पण केलेल्या लेखी आमंत्रण दिले जाते. या सोहळ्यात नववधू राधिकाने अनामिका खन्ना यांनी तयार केलेला लेहेंगा परिधान केला होता.
अनंत अंबानींच्या लग्नसोहळ्यातील यादी
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे चेअरमन स्टीफन श्वार्झमन, डिस्नेचे सीईओ बॉब एग्नर आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. याशिवाय कतारचे प्रीमियर मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी, Adnoc CEO सुलतान अहमद अल जाबेर, EL Rothschild चे चेअरमन लिन फॉरेस्टर de Rothschild, भूतानचे राजा आणि राणी, टेक गुंतवणूकदार युरी मिल्नर आणि Adobe चे CEO शंतनू नारायण इत्यादी देखील उपस्थित राहू शकतात.