हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरील जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून आठ जण ठार झाले. तर अन्य काही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमधील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेदकारपणे बस चालविल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या परिसरातील रस्त्यांची पावसामुळे दयनिय अवस्था झाली आहे. मैरेडूमिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैरेडुमिल्ली येथून ४० किलोमीटरवर असणाऱ्या छत्तीसगढ सीमेजवळ राजुंदरी चिन्टूर या आदिवासी पर्यटनस्थळी ही बस निघाली होती. 



वाल्मिकी कोंडा येथील घाटात एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. यामध्ये पाचजण जागीच ठार झाले. तर अन्य तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. बसमध्ये २० ते २५ पर्यटक प्रवासी होते. अपघातस्थळी मदत पोहोचण्यास उशिर झाला. अतिशय घनदाट जंगल, खराब रस्त्यामुळे मदत पोहोचण्यासही वेळ झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.