आकस्मिक मृत्यूची प्रकरणे गेल्या काही काळापासून बऱ्याच प्रमाणात वाढली आहेत. हृदयविकाराचा झटका (heart attack) किंवा कार्डियक अरेस्टने (cardiac arrest) होणारे मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहेत. नृत्य (Dance) करताना, जिममध्ये (Gym) व्यायाम करताना किंवा धावताना अचानक मृत्यू झाल्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या समजूतदारपणाने एक शेतकऱ्याचा जीव वाचवला. (andhra pradesh farmer suddenly had a cardiac arrest policeman saved his life)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशातून (andhra pradesh) ही घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील महा पदयात्रा (maha padyatra) आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याला (Farmer) अचानक हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि तो गॅमन पुलावर पडला. यावेळी आंदोलनात जमा झालेल्या शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून शेतकऱ्याकडे धाव घेतली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याच्या छातीवर जोरात दाबायला सुरुवात केली. शेतकऱ्याचा श्वास सामान्य होईपर्यंत पोलीस कर्मचारी सीपीआर (CPR) देत राहिला. आंध्र प्रदेश पोलिसांचे सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) रहमेंद्रवर्मा असे या पोलिसाचे नाव आहे. मात्र, यानंतर शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या शेतकऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.



पोलीस महासंचालक केव्ही राजेंद्रनाथ रेड्डी यांनीही या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने आपले कौशल्य दाखवून शेतकऱ्याचे प्राण कसे वाचवले हे दिसत आहे. त्याचा व्हिडिओ आंध्र प्रदेश पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे.