Girls Hostel Hidden Camera : गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी संतापाचं वातावरण असून विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केलं आहे. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यात हा धक्कादायक  प्रकार घडला आहे. इथल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा लपवला. या प्रकरणी कृष्णा जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅपटॉपमध्ये मुलींचे अश्लील व्हिडिओ
पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याचा लॅपटॉप जप्त केला असून या लॅपटॉपमध्ये जवळपास 300 अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ आरोपीने कॉलेजमधल्या इतर विद्यार्थ्यांना विकले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


मुलीने शोधला छुपा कॅमेरा
हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा असल्याची माहिती एका विद्यार्थिनीने कॉलेज प्रशासनाला दिली. ही विद्यार्थिनी जेव्हा वॉशरुममध्ये गेली तेव्हा तिला संशय आला. तिने वॉशरुममध्ये वॉशरुममध्ये शोध घेतला, त्यावेळी एका कोपऱ्यात तिला छुपा कॅमेरा बसवण्यात आल्याचं दिसलं. याची माहिती तीने लगेच कॉलेज प्रशासनाला दिली. विद्यार्थिनींच्या सुरक्षा आणि गोपिनियतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी न्यायाची मागणी केली आहे. छुपा कॅमेरा बसवणाऱ्या आणि व्हिडिओ खरेदी करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी कॉलेजमधल्या विद्यार्थिनींनी केली आहे. 


कॉलेज प्रशासनाने दिलं आश्वासन
कॉलेज प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी मदत करणअयाचं आश्वासन कॉलेज प्रशासनाने दिलं आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचा निर्णयही कॉलेज प्रशासनाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बंगळुरुमध्येही अशीच घटना घडली होती. एका कॅफे शॉपच्या वॉशरुममध्ये मोबाईल फोन सापडला होता. यात काही मुलींचे व्हिडिओ होते. कॅफेतल्याच एक कर्मचाऱ्याने आपला मोबाईल महिलांच्या वॉशरुमध्ये ठेवला होता.