नवी दिल्ली : ऑन ड्युटी असलेल्या पोलिसातील माणुसकीचे दर्शन वेगवेगळ्या घटनांमधून होत असतं. असाच एक प्रसंग आंध्र प्रदेशमध्ये समोर आला. या घटनेत महिला पोलिसाची संवेदनशीलता समोर आली आहे. बेवारस मृतदेह स्वत:च्या खांद्यावरुन नेऊन त्याचे अंत्यसंस्कार करण्याचे मोठे कार्य या महिला पोलिसाने केलंय. त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होतंय. पोलिस निरीक्षक के. सिरीशा असे या महिला पोलिसाचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवस बेवारस मृतदेह पडलेला मृतदेह उचलण्यास कोणीही धजावत नव्हतं. पोलिस निरीक्षक के. सिरीशा तिथे गेल्या. लोकांना मदतीसाठी बोलविले. मात्र कोणीही आलं नाही. त्यावेळी सिरीशा यांनी स्वत: मृतदेह आपल्या खांद्यावर उचलून दोन किमी अंतर चालत स्मशानभूमीत नेला. 



८० वर्षाच्या भिकाऱ्याचा हा मृतदेह होता. या मृतदेहावर अंत्यसंस्कारही त्यांनीच केले. आंध्र प्रदेश पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला. 


लोकांची सेवा करण्यासाठी ही नोकरी आहे. अशी प्रतिक्रीया सिरीशा यांनी दिली. डीजीपी गौतम स्वांग यांनीही सिरीशा यांच्या कामाचं कौतुक केलंय.