Shocking Video Viral On Social Media: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात तीन शाळकरी मुलं रिक्षाच्या छतावर बसून प्रवास करताना दिसत आहेत. या मुलांचं वय 11 ते 13 वर्षांच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षा ड्रायव्हर विरोधात बरेलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. एक चुकी महागात पडली असती. कदाचित मुलांना जीव देखील गमवावा लागला असता, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ट्विटर यूजर्सने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, 'हे उत्तर प्रदेशातील बरेलीतील दृश्य आहे. निष्काळजीपणे रिक्षा चालवणाऱ्या ड्रायव्हरसोबत तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवू शकता. ही रिक्षा शुक्रवारी आरटीओ, पोलीस चौकी यांच्या कार्यालया समोरून गेली. मात्र कोणाचंही लक्ष गेलं नाही. रजिस्टर्ड प्लेट नंबरवर कोणतीही कारवाई केली नाही.'



हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बरेली पोलिसांनी कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'त्यांनी ऑटोरिक्षा चालकाला दंड ठोठावला आहे आणि नियमानुसार कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मुलांच्या पालकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.'


छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राजीव कुमार सिंह यांनी सांगितलं की, 'आम्ही एका अनोळखी ड्रायव्हरवर रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कारण त्याने अनेक मुलांचा जीव धोक्यात घातला आहे. सर्व मुले शालेय गणवेशात होती आणि अशा वाहनचालकाने मुलांचा जीव धोक्यात घालू देऊ नये यासाठी आम्ही शाळा प्रशासनाशीही बोलू. मोटार वाहन कायद्यांतर्गत ऑटोही जप्त करण्यात येणार आहे.'