नवी दिल्ली: लग्नामध्ये बहिणीच्या नवऱ्याचे शूज लपवणे किंवा नवरीसाठी दार अडवून पैसे मागणं ही परंपरा काही नवीन नाही. प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून किंवा तिच्या झालेल्या बहिणीच्या नवऱ्याकडून पैसे घेण्यासाठी संधीच शोधत असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात मात्र सगळ्या मागचा हेतू हा एकच असतो. असाच एक लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीजा आणि साली यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की नुकतच लग्न झालेलं जोडपं बसलं आहे. तर साली जीजूकडून पैशांची मागणी करत आहे. दहा आणि पंधरा हजार नाही तर तब्बल 2 लाख रुपयांची मागणी तिने आपल्या जीजूकडे केली आहे. जीजू तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतात. 


ऐकेल ती मेहुणी कसली. तिने थेट जीजूचे पायच धरले आणि 2 लाख देण्याच्या बोलीवर हटूनच बसली. तिला मनवण्याचा खूप प्रयत्नही नवरदेवानं केला. नवरदेवानं शगुनाचे पैसे पुढे केले. मात्र ती 2 लाख रुपये द्या यासाठी अडवून बसते. त्याच वेळी वधूच्या घरचे लोक नवरदेवासमोर घोळका करतात. हा सगळा प्रकार पाहून नवरदेव वैतागतो. मेहुणीला देण्यासाठी काढलेलं पैशांचं बंडलही दुसऱ्याला देऊन टाकलं.


चिडलेल्या नवरदेवानं आपल्या पत्नीला घेऊन तिथून उठून निघून जाण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे.