मुंबई : देशात कोरोनांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनार नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. काल जनता कर्फ्यूच्या माध्यमातून 5 वाजता संपूर्ण देश या कठीण परस्थितीत एकत्र असल्यांचं दृश्य संपूर्ण जगाने पाहिलं होतं. त्यातच आता कोरोनाचा सामना करण्यासाठी व्यापारी आणि उद्योजग पुढे येत आहेत. आनंद महिंद्राच्या घोषणेनंतर वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही मदतीची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल अग्रवाल यांनी कोरोना रोखण्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोना विषाणूचे औषध तयार करण्यासाठी 5 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


आनंद महिंद्रांपासून सुरुवात


महिंद्र अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी पहिल्यांदा स्वत: स्वेच्छेने पुढे येत आपला संपूर्ण पगार देशाला देण्याची घोषणा केली होता. तसेच आपल्या सहकाऱ्यांना देखील कोरोना फंडामध्ये देणगी देण्यासाठी त्यांनी आवाहन केले. येत्या काही महिन्यांत अधिकाधिक हातभार लावणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.


अनिल अग्रवाल काय म्हणाले?


अनिल अग्रवाल यांनी ट्विट केले की, या महामारीचा सामना करण्यासाठी मी 100 कोटी देण्याचे वचन देतो. ही ती वेळ आहे जेव्हा देशाला आमची सर्वाधिक गरज आहे. अनेकांमध्ये भविष्याबाबत अनिश्चितता असते आणि मी रोजंदारी करणाऱ्यांच्या बाबतीत अधिक चिंता करत आहे. आम्ही आमच्याकडून मदतीचा पूर्ण प्रयत्न करु.'



पेटीएमची मदतीची घोषणा


पेटीएमने कोरोनावर औषध शोधण्यासाठी ५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. यावर औषध शोधण्यासाठी भारतीय संशोधकांना ते ५ कोटी रुपये देणार आहेत. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी रविवारी ट्विट करत म्हटलं की, 'आम्हाला मोठ्या प्रमाणात भारतीय संधोधकांची गरज आहे. जे वेंटिलेटरची कमी दूर आणि कोविडवर उपचार शोधू शकतील. पेटीएम कोविडवर संशोधन करणाऱ्या अशा टीमला ५ कोटी देईल.'