Cow Hug Day on Valentine Day 2023: 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त केले जाते. पाश्चिमात्य देशात असेलेली व्हॅलेंटाईन डे ची क्रेज भारतातही पहायला मिळत आहे. भारतात मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो. परिणामी व्हॅलेंटाईन डे दिवशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं पहायला मिळतात. अशातच 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारा (Cow Hug Day)असे आवाहन करण्यात आले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस गायीला मिठी मारुन साजरा करण्याचं आवाहन भारतीय प्राणी कल्याण मंडळानं केले आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे प्राचीन वैदिक परंपरा दुर्लक्षित होत आहे. म्हणून 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारुन वैदिक परंपरेचं पालन करुया असं मंडळाच म्हणण आहे. गाईला मिठी मारल्याने भावनिक संपन्नतेचा अनुभव घेता येईल असा दावाही मंडळाने केला आहे.


गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा  हिंदू संस्कृतीत गायीला विशेष महत्व आहे. गाईला माता मानले जाते. या गो माते प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे दिवस Cow Hug Day म्हणून साजरा करा असे आवाहन करण्यात आले आहे. 


काळाच्या ओघात पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा याचा जवळजवळ विसर पडला आहे.


गायीला मिठी का मारायची?


गाईचे प्रचंड फायदे आहेत. गाईला मिठी मारल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येईल तसेच आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद मिळेल.
व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून म्हणजे मंगळवारपासून सुरू झाला आहे. 14 फेब्रुवारीला  चालतो. Valentine Day 2023 साजरा केला जाणार आहे.