नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने पास केलेल्या तीन कृषी बिलांच्या विरोधात शेतकऱ्यांनी 'भारत बंद' केला. राजधानी दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर गेल्या १२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विरोधकांसोबत बॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार्सदेखील उतरले आहेत. आता शेतकऱ्यांच्या समर्थनाथ ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे (Anna Hazare)मैदानात उतरलेयत. आज आण्णा हजारे एका दिवसाच्या उपोषणाला बसले.


'देशभरात हवे आंदोलन' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या समर्थनाथ देशभरात आंदोलन व्हायला हवे. यामुळे सरकारवर दबाव वाढेल आणि शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य निर्णय लागेल असे आण्णा हजारे म्हणाले. दिल्लीमध्ये सुरु असलेले आंदोलन पूर्ण देशभरात व्हायला हवे. सरकारवर दबाव टाकण्यासाठी ही स्थिती बनवण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. पण यात हिंसा होऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले.  



हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. अनेक दिवस आंदोलन सोडविण्याच्या प्रयत्नात ते होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी पंजाब आणि हरियाणाच्या आंदोलक शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली. 9 डिसेंबर रोजी होणार्‍या सहाव्या फेरीच्या चर्चेआधी हरियाणाचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्यात होणारी बैठक फार महत्वाची मानली जातेय.


यूपी गेटवरील किसान आंदोलनात सहभागी असलेल्या भीम आर्मीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारत बंदवरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, 'मतांच्या माध्यमातून जनतेचा पाठिंबा मिळू न शकलेले विरोधक आज कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यावर उतरले आहे. जेणेकरुन त्याचे राजकारण चमकू शकेल. कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे. जो अराजक पसरवतो.'