नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी तथाकथित भीमानंद महाराजला पुन्हा एकदा अटक केली आहे. पोलिसांनी भीमानंद महाराजला सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच त्याच्यावर फसवणुकीचा देखील आरोप आहे. याआधी ही भीमानंद महाराजला २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर त्याची सूटका झाली होती.


स्वामी भीमानंद मध्यप्रदेशच्या चित्रकूटमधील चमरौहा गावचा राहणारा आहे. तो स्वत:ला साई बाबाचा अवतार असल्याचा दावा करतो. तो स्वत:ला इच्छाधारी संत स्वामी भीमानंद महाराज सांगतो. शिव मूरत द्विवेदी असं त्याचं खरं नाव आहे. तो १९८८ मध्ये दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये तो गार्डची नोकरी करायचा. १२ वर्षातच स्वामी भीमानंद महाराजने कोटींची संपत्ती जमा केली. ईडीने २०१५ मध्ये याची संपत्ती जप्त केली होती.