नवी दिल्ली : आपल्या अभिनयामुळे घराघरांमध्ये पोहोचलेले आणि आपला वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केलेले अभिनेता अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे सहाजीकच त्यांच्यावर अनेकदा मोठ्या प्रमाणावर टीका होते. एका वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत खेर यांनी आपल्यावरील टीकेला प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, जे लोक टीका करतात ती बरोबर आहे. करू देत त्यांना टीका, जितकी करायची तितकी करू देत. कोणाची बादली बणून राहण्यापेक्षा मोदींचा चमचा म्हणून राहणे केव्हाही चांगले. अनुपम खेर यांना आपण मोदींची खूपच स्तुती करता. त्यामुळे आपणावर मोठ्या प्रमाणात आणि तीव्र शब्दांमध्ये टीका केली जाते, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर खेर यांनी हे उत्तर दिले.


पुढे बोलताना अनुपम खेर म्हणाले, आपल्या देशात जर कोणी आपल्या जाती, धर्माबाबत बोलत असेल तर, त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यांनी आपल्या अंगावरील धार्मिक प्रतिकांकडे अंगुली निर्देश करत म्हटले पहा ही वस्तू मी वापरतो. जी मला माझ्या आईने दिली आहे. पण, मी तावीजही वापरतो जो, मला एका मुस्लिमी पीरने दिला आहे. हीच खरी हिंदुस्तानची ओळख आहे, असेही खेर म्हणाले.