Akshay Tritiya | सोनेच नाही तर दानधर्मालाही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठे महत्व; जाणून घ्या
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मंगलमुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया होय.
Akshay Tritiya | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मंगलमुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया होय. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फक्त सोने खरेदीला मोठे महत्व आहे. हा असा सण आहे की, जो अक्षय आनंद आणि समृद्धी प्रदान करतो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पुण्य प्राप्त करायला हवे. असे पुण्य जे कधीही कमी होणार नाही आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी अबाधित राहील.
या गोष्टींच्या दानातून मिळेल सौभाग्य
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया होय. या दिवशी पूजा पाठ, व्रत तसेच दानाचे महत्व मोठे आहे. सौभाग्य आणि समृद्धी साठी या गोष्टींचे दान अवश्य करा.
1. जलपात्र दान - वैशाख महिन्यात असेही लोकांना पाणी पाजणे हे पुण्याचे काम आहे. त्यामुळे, घागर, माठ आदींचे दान करणे शुभ मानले जाते. दान देतांना माठ किंवा घागर पाण्याने भरून दान द्यावी
2.अन्नदान - कोणत्याही तहानलेल्याला पाणी देणे किंवा भुकेल्याला अन्न देणे हे पुण्याचे काम आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नदान केल्याने नवग्रह शांत होात. देवतांची कृपा होते. आयुष्य़ात सुख समृद्धी प्राप्त होते.
3.धान्याचे दान - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ज्वारी, सत्तू, तिळ आणि तांदूळाचे दान महत्वाचे आहे. व्यक्ती आपल्या सर्व पापांपासून मुक्त होतो. शास्त्रांमद्ये कनिक हे सोन्याइतकेच महत्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे धान्याचे दान महत्वाचे आहे.
4.सुहाग किंवा कपड्यांचे दान - अक्षय्य तृतीयेला इच्छेनुसार कपडे किंवा सुवासिनेने ओटी भरली तरी त्याने लाभ होतो. शुक्राची कृपा तुमच्या कुटूंबावर राहिल आणि सुख समृद्धी नांदेल.
--------------------------------------
(वरील लेख सामान्य माहितीच्या आधारे प्रसिद्ध आहे. Zee Media याबद्दल खात्री देत नाही.)