नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचा मार्ग कठीण होत चालला आहे. एकीकडे विरोधी पक्षांची महाआघाडीचं संकट भाजपसमोर असताना मित्रपक्ष देखील भाजपची साथ सोडत असल्याने भाजप पुढची आव्हानं वाढत चालली आहेत. एनडीएचे राज्यामधील मित्रपक्ष देखील भाजपवर नाराज आहेत. त्यातच आता आणखी एका पक्षाने भाजपवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील एनडीएचा भाग असलेल्या अपना पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी अपना दलचे नेते अध्यक्ष आशिष पटेल यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की, 'भाजपने नुकताच झालेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून शिकलं पाहिजे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी मंगळवारी अपना दलचे अध्यक्ष आशिष पटेल यांनी म्हटलं होतं की, 'भाजपच्या नेतृत्वाने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सारख्या हिंदी भाषिक राज्यात मिळालेल्या पराभवातून शिकण्याची आणि चिंतन करण्याची गरज आहे. यूपीच्या योगी आदित्यनाथ सरकार नेतृत्वावर देखील त्यांनी नाराजी व्यक्ती केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, अपना दलच नाही तर भाजपचे अनेक आमदार, खासदार आणि मंत्री देखील सरकारवर नाराज आहेत. एनडीएमध्ये सहभागी असलेले पक्ष निराश आहेत. त्यांना योग्य तो सन्मान मिळत नाही आहे. पक्षाच्या नेतृत्वाचं जर असंच वागणं असेल तर एनडीएलला युपीमध्ये मोठा फटका बसू शकतो.'



काही दिवसांपूर्वीच भाजप आणि अपना दल यांच्यात काही वाद पाहायला मिळाला होता. एकीकडे मिर्झापूरमध्ये मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या कार्यक्रमावर भाजप नेते बहिष्कार टाकत आहेत. तर दुसरीकडे अनुप्रिया पटेल यांनी देखील भाजपच्या एकही कार्यक्रमात जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे.'


बिहारमध्ये भाजप नेतृत्वाने मित्रपक्ष एलजेपी समोर झुकतं माप घेतलं. त्यांच्या मागण्या मान्य करत भाजपने त्यांची नाराजी दूर केली. त्य़ातच उत्तर प्रदेशमध्ये एसपी-बीएसपी युतीमुळे भाजप पुढचं आव्हान आणखी वाढणार आहे. मित्रपक्षाच्या नाराजीमुळे निवडणुकीत भाजपला याचा फटका बसू शकतो.