आधी पॅनकार्ड काढून घ्या, अन्यथा या सेवा होणार बंद
2018 मध्ये सरकारने पॅनकार्ड संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला पॅनकार्ड बनवणे अनिवार्य असणार आहे.
मुंबई : 2018 मध्ये सरकारने पॅनकार्ड संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला पॅनकार्ड बनवणे अनिवार्य असणार आहे.
1. 31 मार्च 2018 पर्यंत बँक खात्याशी पॅननंबर जोडणं अनिवार्य आहे. अन्यथा खातं बंद होणार.
2. नवीन बँक खात्यासाठी किंवा व्यवहारांसाठी देखील आता पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
3. आता 50 हजारापेक्षा अधिकच्या व्यवहारांवर पॅनकार्ड असणं आवश्यक आहे.
4. पॅनकार्ड शिवाय तुम्हाला प्रॉपर्टी देखील खरेदी करता नाही येणार आहे.
5. नवी गाडी खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड असणं आवश्यक असणार आहे.
6. क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी देखील तुम्हाला पॅनकार्ड असणं आवश्यक आहे.
7. भविष्यात एअर तिकीटसाठी देखील पॅनकार्ड अनिवार्य होणार आहे.
8. भविष्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील पॅनकार्ड असणं आवश्यक असणार आहे.