Appraisal ची आशा असतानाच `या` मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला ठेंगा; 4000 जणांच्या नोकरीवर गदा
आधी 900 लोकांना कामावरून काढणाऱ्या एका नामांकित कंपनीकडून आता ....
नवी दिल्ली : सध्याचा काळ हा नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर साचेबद्ध कामांबद्दल, नोकरीबद्दल आणि कंपनीबद्दल रडणारे तुम्हीआम्ही सगळेच या महिन्यात मात्र अतिशय आशावादी आहोत. निमित्त आहे ते म्हणजे सध्याचा पगारवाढीचा काळ. वार्षिक पगारवाढीच्या याच दिवसांमध्ये अर्थात अप्रायझलच्या दिवसांमध्ये एका बड्या कंपनीनं मात्र तिथं काम करणाऱ्यांना मोठा धस्का दिला आहे. (Job Appraisal news)
कारण आधी 900 लोकांना कामावरून काढणाऱ्या एका नामांकित कंपनीकडून आता 4000 हून अधिकजणांच्या नोकरीवर गदा आणण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार Better.com चे विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ यांनी साधारण 3 महिन्यांपूर्वी 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. एका झूमक़ॉलमध्ये त्यांनी हा धक्का दिला होता.
द्यानंतर आता पुन्हा एकदा या कंपनीनं कर्मचाऱ्यांची स्वप्न बेचिराख केली आहेत. Better.com याच आठवड्यामध्ये त्यांच्या 4 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे.
टेक क्रंच संकेतस्थळानं या वृत्तावर शिक्कामोर्तबही केलं आहे. हा आकडा पाहता कंपनी त्यांची 50 टक्के कर्मचारीसंख्या कमी करत आहे.
कोरोना महामारी आणि महागाईच्या या काळात कंपनीनं ऑनलाईन पर्यायांकडे जाणाऱ्या ग्राहकांचा आकडा वाढल्याचं पाहिलं. त्यातच Better.com चे सीईओ विशाल गर्ग एक महिन्याच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू झाले ज्यानंतर अनेक वरिष्ठ अझिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.
सूत्रांच्या माहितीनुसार गर्ग परतल्यानंतर एग्जीक्यूटिव वाइस प्रेसीडेंट म्हणून कार्यरत असणाऱ्या सारा पियर्स आणि सीनियर वाइस प्रेसीडेंट इमॅन्युएल सँटा डोनाटो यांनीही कंपनीला रामराम ठोकला.
दरम्यान, मागच्या वेळी जेव्हा गर्ग यांनी 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं, तेव्हा असं करण्यामुळं आपल्याला दु:ख झाल्याचं म्हटलं होतं. सोशल मीडियावरही त्यांच्यावर अनेकांनीच निशाणा साधला होता.
यावेळी हेच गर्ग पुन्हा एकदा कर्मचारी कमी करण्याच्या त्यांच्या निर्य़णामुळं अनेकांच्याच रोषाला बळी पडणार यात शंका नाही.