Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांडांनं (Shraddha Walkar Murder Case) सारा देश हादरून गेलाय. नराधम आफताबनं (Aaftab Poonawala) श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले. आफताबच्या या कृत्यावर देशभरातून संतापाची लाट उसळलीय. मात्र दुसरीकडे सोशल मीडियात (Social Media) अशी एक पिलावळ आहे, ज्यांनी आफताबच्या काळ्या कृत्याचं समर्थन केलंय. 'आफताब तूने बहोत अच्छा किया' असं म्हणत त्यांनी अक्षरश: कौतुकाचे पूल बांधलेत. श्रद्धा हत्याकाडांनंतर फेसबुकवर (Facebook) अफताबच्या अकाऊंटवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय. त्यातही त्याच्या क्रौर्याचं समर्थन करणारे महाभाग दिसून येत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर आफताबच्या धर्माचा शोध
निष्पाप श्रद्धाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणारा आफताबनं सोशल मीडियात स्वत:ची ओळख फूड ब्लॉगर (Food Bloger) आणि पर्यावरणवादी (Environmentalists) दाखवलीय. इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याचे 28 हजार 500 फॉलोअर्स (Followers) आहेत. गुगलवर (Google) श्रद्धा मर्डर केस (Shraddha Murder Case) नावानं सर्वाधिक सर्चिंग होतंय. नेटीझन्स आफताब पुनावालाचं फेसबुक अकाऊंट, इन्स्टाग्राम आयडी शोधतायेत. आफताबचा धर्म शोधणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. 


आफताबचं समर्थन कोण करतंय?
आफताबनं केलेल्या क्रौर्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. जे श्रद्धाच्या बाबतीत घडलं ते कुणासोबतही घडू नये यासाठी देशातली प्रत्येक माऊली टाहो फोडतीय. त्यामुळे आता सवाल हाच आहे की सोशल मीडियात आफताबचं समर्थन कोण करतंय? त्याची पाठराखण करणारे समाजात विष का कालवतायेत? यामागेही छुपा धर्मांध चेहरा तर नाही ना? असा संशय आहे. मात्र सोशल मीडियावर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या विकृतांना चाल घालण्याची गरज आहे. 


आफताबची पोलिसांकडून कसून चौकशी
आरोपी आफताब दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिल्यानंतरही पोलीसांसमोर आव्हान आहे ते ठोस पुरावा शोधण्याचं. पोलिसांना अजूनही श्रद्धाचा मोबाईल, तिचे कपडे आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र सापडत नाहीए. त्यातच आफताब वारंवार आपला जबाब बदलत असल्याने पोलीसांसमोर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 


आता आफताबने आपल्या जबाबात सांगितलं, तो श्रद्धाला मारु इच्छित नव्हता, पण श्रद्धा त्याच्यावर ओरड होती. त्यामुळे माझा संताप झाला आणि गांजाच्या नशेत मी तिचा गळा दाबला. पण यात तिचा मृत्यू झाला. शिक्षेपासून वाचण्यासाठी आफताब नवनवीन कुंभाड रचत असल्याचं समोर आलं आहे.