मुंबई : ड्रिंक करणे आता सर्वत्र कॉमन झाले आहे. लग्न असो किंवा कोणता कार्यक्रम दारु शिवाय सर्वच अपूर्ण असते. यामधील बरेच लोक त्यांच्या आवडत्या ब्रँडचे पेय पितात, तर काही लोक नवीन पेय ट्राय करण्याचा विचार करतात. परंतु आपल्याला या नवीन ब्रँडबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे ते कसे बनवले जातात किंवा कुठून येतात याची माहिती आपल्याला नसते आणि कोणत्या ही गोष्टीची अपूर्ण माहिती म्हणजे धोक्याची घंटा असते. खरंतर असंच प्रकरण सिंगापूरमधून समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूरमध्ये नाल्यातील पाणी शुद्ध करून बिअर तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होय, सांडपाण्याचे पाणी आणि मूत्र यांचा पुनर्वापर करून बिअर ड्रिंक्स तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.


NEWBrew नावाचा बिअर ब्रँड 'NeWater' या सिंगापूरमधील स्वच्छ आणि उच्च दर्जाच्या पुनर्वापर केलेल्या पाण्याच्या ब्रँडमधून पाणी वापरतो आणि त्याची बिअर बनवतो.


बीबीसी न्यूजमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, हे सांडपाण्यापासून पुनर्वापर करून फिल्टर केलेल्या द्रवापासून बनवले जाते. सिंगापूरच्या नॅशनल वॉटर एजन्सी PUB ने स्थानिक क्राफ्ट बिअर ब्रुअरी Brewerkz च्या सहकार्याने लाँच केले.


स्ट्रेट टाईम्सच्या बातमीनुसार, हे अनोखे पेय केवळ हे सिंगापूरचे रिसायकल केलेले पाणी पिण्यासाठी सुरक्षित पाणी आहे, तसेच हे आंतरराष्ट्रीय मानकांचेही पालन करते.


प्रीमियम जर्मन बार्ली माल्ट्स, सुगंधी सिट्रा आणि कॅलिप्सो हॉप्स यासारख्या उत्कृष्ट घटकांचा वापर करून ही बिअर तयार केली आहे. ट्रॉपिकल ब्लंडर एले बिअर ९५ टक्के न्यूवॉटरपासून बनलेली असते. हे पेय प्यायल्यानंतर काहींना त्याची चव आवडली आहे.


एवढंच काय तर अनेक लोकांनीही बिअरची चाचणी केल्यानंतर चांगले रिव्ह्यू देखील दिले आहे.