Argument Over Sharing Pizza​: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच जण चवीने पिझ्झा खातात. पण नुकताच या पिझ्झावरुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिझ्झा वाटण्यावरुन एका कुटुंबात वाद झाला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका महिलेला तिच्या जावेच्या भावांनी चक्क गोळी मारली आहे. या प्रकरणात चार लोकांना अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही घटना घडली असून चार लोकांना अटक करण्यात आलं आहे. ही घटना दक्षिण पूर्व दिल्लीतील सीलमपूरमधील आहे. 


पिझ्झा वाटण्यावरुन चालवली गोळी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीटीबी रुग्णालयात सीलमपुर पोलिस ठाण्यात याबाबत सांगण्यात आले की, एक महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आहे. प्राथमिक चाचणीत समोर आळं आहे की, पीडिताचे दीर झिशान यांनी बुधवारी संपूर्ण कुटुंबासाठी पिझ्झा आणले. त्यांनी आपला लहान भाऊ जावेद यांच्या पत्नीला सादमासह सगळ्या लोकांना पिझ्झा दिला. 


पिझ्झा वाटण्यावरुन झाला वाद 


अधिकाऱ्यांनी सांगितलं की, झिशानची पत्नी सादियाला सादमाला पहिली पिझ्झा दिला ते आवडलं नाही. पतीने पहिला पिझ्झा आपल्या जावेला दिला यावरुन ती नाराज झाली आणि तिने वाद केला. यावरुनच तिघांमध्ये वाद झाला. पुढे अधिकारी म्हणाले की, 21 वर्षीय सादियाचा पती झिशान आणि सासरच्या संपूर्ण कुटुंबाशी वाद होता. 


बुधवारी रात्री सादियाने आपल्या चारही भावांना बोलावलं. मुनताहिर, तफसीर, शहजाद आणि गुलरेज यांना आपल्या घरी बोलावलं. त्यांचा देखील सादियाच्या सासरच्या मंडळींशी वाद झाला. या दरम्यान मुतांहिरने गोळी झाडी जी थेट झिशानलचा लहान भाऊ जावेदच्या पत्नीला लागली. 


जावेच्या पोटाला लागली गोळी


पोलिसांनी सांगितले की, सदमाच्या पोटात गोळी लागली असून तिच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुनताहिर, तफसीर, शहजाद आणि गुलरेज यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, सादियाने पिझ्झा वाटपावर आक्षेप घेतला तेव्हा झिशान कुटुंबातील मंडळींना पिझ्झा देत होता. तो म्हणाला, “झिशान, सादिया आणि सदमा यांच्यात भांडण झाले होते.


डोकं भितींवर आपटलं 


सादियाने सदमाचे डोके भिंतीवर आपटण्यास सुरुवात केली. यानंतर ती तेथून निघून गेली आणि गाझियाबादहून आलेल्या भावांना फोन केला. तिच्या भावांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना शिवीगाळ केली आणि त्यातील एकाने सादियाला गोळ्या घातल्या." गोळ्यांचा आवाज ऐकून अनेक शेजारी घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी सादियाच्या भावांना एका खोलीत बंद केले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पीडितेच्या नातेवाईकाने सांगितले की, "आरोपी या भावांपैकी एक होता. पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळ्या झाडल्या, परंतु स्थानिक रहिवाशांनी त्याला पकडले."