मुंबई : आपले प्रेम व्यक्त करणे नेहमीच एक सुंदर भावना असते. मात्र, याठिकाणी एक पक्षी आपले प्रेम व्यक्त करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. सध्या हा सुपर क्यूट व्हीडिओला सोशल मिडियावर प्रचंड शेअर आणि लाईक्स मिळत आहेत. कारण हा व्हीडिओ इतका सुंदर आहे की, तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा पाहिल्या शिवाय राहू शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओमध्ये एक पक्षी आपल्या क्यूट आवाजात I LOVE YOU म्हणत आहे. हा व्हिडीओ बघण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही. या पक्षाला पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल आणि तुम्हीही त्याला I LOVE YOU TOO म्हणण्यापासून रोखू शकणार नाही.


हा व्हीडिओ ARLO नावाच्या पक्षीचा आहे. याला पॅसेफिक पॅरटलेट किंवा प्रशांत पोपट सुद्धा म्हणतात. या सुपर क्यूट व्हीडिओमधील हा गोंडस पोपट समोरच्या व्यक्तीला I LOVE YOU म्हणत आहे. हा गोंडस अर्लो फक्त दोन वर्षाचा आहे. अर्लो हा त्याचा मालकाला पाहून उत्साहित झाला आणि  नाचायला लागला.


हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पक्षाची हालचाल आणि वागणे पाहून कोणाच्या ही तोंडातून फक्त एकच शब्द निघेल तो म्हणजे 'WOW' या व्हीडिओला शेअर करताच काही तासातच लाखो लाईक्स मिळाले आहेत. आतापर्यंत 87 लाख लोकांनी हा व्हीडिओ पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हीडिओ वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. मात्र, या गोंडस पोपटाचा व्हीडिओ सगळ्यांच्या वरचढ आहे. पांढऱ्या रंगाच्या या गोंडस पोपटाचा व्हीडिओ तुम्ही एकदा पाहाच.



या गोंडस पोपटाने लाखो लोकांची मन जिंकली आहेत. त्याच्या I LOVE YOU म्हणायच्या अंदाजामुळे सगळे नक्कीच त्याच्या प्रेमात पडतील.