नवी दिल्ली : लडाख सीमा वादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. चीनशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे लेह येथे पोहोचले. त्यांनी एकूण परिस्थितीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, त्यांनी लेहच्या सैन्य रुग्णालयात भेट दिली आणि जखमी सैनिकांना प्रोत्साहन केले. लष्करप्रमुखांचा दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार पेंगंग तलाव आता भारत आणि चीनमधील वादाचा मुख्य मुद्दा बनत चालला आहे. चीनच्या फिंगर 4 येथे सुरु असलेल्या बांधकामावर भारतीय सैन्याचा सर्वाधिक आक्षेप आहे. 5 मे रोजी पेंगाँग तलाव येथे भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये पहिली झटापट झाला. भारत तणाव कमी करण्याच्या बाजुने आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य मागे हटायला तयार नाही. सोमवारी मोल्डोमध्ये भारत आणि चीन यांच्यात बैठक झाली. दोन्ही देशांमध्ये मागे हटण्याबाबत सहमती झाली.


लडाखच्या गलवान घाटीमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर लष्करप्रमुख पहिल्यांदा लेह दौऱ्यावर आले आहेत. याआधी वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी रविवारी लडाखच्या दौऱा केला होता. लडाख सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक झडपमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे 40-50 सैनिक मारले गेले होते. पण चीनने याबाबत कोणताही खुलासा केला नाही.