राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू
स्वातंत्र्यदिनासाठी विशेष सुरक्षा चक्र तैनात करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे बरोबर ४८ तास आधी म्हणजे आज पहाटे पासून नवी दिल्ली परिसरात स्वातंत्रदिनाच्या सोहळ्याची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी लष्कर, वायूसेना आणि नौदलाच्या जवानांची आकर्षक परेड बघयाला मिळाली.
मोठ्य़ाप्रमाण सुरक्षा व्यवस्था
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तान आज सकाळपासून मोठ्य़ाप्रमाण सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मूळ कार्यक्रमाला ज्यांना प्रवेश मिळत नाही, त्या सर्वांना या कार्यक्रमाला येऊन स्वातंत्रदिनाच्या सोहळ्याची भव्यता अनुभवता येते. स्वातंत्र्यदिनासाठी विशेष सुरक्षा चक्र तैनात करण्यात आले आहे.
ड्रोन आणि पतंगानाही बंदी
दरम्यान, लाल किल्ला पसर, वर्दळीच्या बाजारपेठा, हॉटेल, मॉल, इंडिया गेट, बस स्थानक परिसरात सुरक्षेची कडेकोट काळजी घेण्यात आलीय. लाल किल्ला परिसरात स्नायपर तैनात करण्यात आले असून, ड्रोन आणि पतंगानाही बंदी घालण्यात आलीय. सुरक्षेसाठी एनएसजी कंमाडोही तैनात करण्यात आले आहे.