Army Soldier Murder: तामिळनाडूत (Tamilnadu) भारतीय लष्कराच्या जवानाची (Indian Army Soldier) हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. कृष्णागिरी येथे पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यावरून झालेल्या ३३ वर्षीय लष्कर जवानाची द्रमुकचा नगरसेवक (DMK Councillor) आणि इतरांनी बेदम मारहाण करत हत्या केली. प्रभाकरन (Prabhakaran) असं या जवानाचं नाव आहे. द्रमुकचा नगरसेवक चिन्नास्वामी (Chinnaswamy) याच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून चिन्नास्वामी आणि इतरांनी त्यांची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक (Arrest) केली आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 फेब्रुवारीला पाण्याच्या टाकीजवळ लष्करात जवान असणारे प्रभू आणि त्यांचा भाऊ प्रभाकरन दोघेही कपडे धूत होते. यावरुन चिन्नास्वामी याने त्यांना जाब विचारला. पिण्याच्या पाण्याजवळ कपडे का धूत आहात अशी विचारणा त्याने केली. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर चिन्नास्वामी याने इतर 9 जणांसोबत मिळून प्रभू आणि प्रभाकरन या दोघांनाही मारहाण केली. 


मारहणीत जखमी झालेल्या प्रभाकरन यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



पोलिसांकडून काय कारवाई?


पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये चिन्नास्वामी याचा मुलगाही आहे. प्रभू यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अटकेची कारवाई केली. दरम्यान घटनेनंतर चिन्नास्वामी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


पोलिसांनी सांगितलं आहे की, "चिन्नस्वामी याने नऊ जणांसोबत मिळून प्रभाकरन आणि त्यांचा भाऊ प्रभू यांना मारहाण केली. प्रभू यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे सहाजणांना अटक केली आहे. यामध्ये चिन्नास्वामीचा मुलगाही आहे".