मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati  Shivaji Maharaj) नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. शिवाजी महाराज म्हणजे धगधगता इतिहास. त्यांचं शौर्य, विचार साऱ्या जगासाठी प्रेरणादायी आहेत. या शिवरायांचा एक व्हीडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगातही शंभर हत्तींचं बळ संचारल्याशिवाय राहणार नाही. (army soldier saluate to shivaji maharaj statue video gose viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगावर शहारे येईल असंच हे दृश्य. जम्मू-काश्मिरच्या कुपवाड परिसरात तुफान बर्फवृष्टी सुरूंय. घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय. अशातही इथल्या माछिल सेक्टरमध्ये देशाचे जवान डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करतायत. इथंच असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा भारतीय जवानांसाठी प्रेरणादायी ठरतोय. अशाच एका जवानानं शिवरायांना केलेला मानाचा मुजरा सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय.



छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं म्हटलं की कुणाच्याही अंगात शंभर हत्तींचं बळ संचारतं. कडाक्याच्या थंडीत सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांनाही शिवाजी महाराज स्फूर्ती देत आहेत. लाख संकटं आली तरी ती झेलून घेणारी पहाडी छाती आणखी फुलून येते. आपल्या पाठीशी शिवरायांच्या रूपात अदृष्य शक्ती आहे, याची या जवानांना खात्री आहे.