नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून कारवाया सुरू झाल्यात. यावेळी त्यांनी भारतीय सेनेच्या जवानांना आपल्या निशाण्यावर घेतलंय. रविवारी दहशतवाद्यांनी अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात भारतीय सेनेचे तीन जवान जखमी झालेत. या जवानांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमेवर हालचाली दिसून येत आहेत. पाकिस्ताननं सीमारेषेच्या आणखीन जवळ परंतु, नवीन ठिकाणी आपला तोफखाना हलवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्ताननं सीमारेषेजवळ १०५ मिमी तोफांची ४ रेजीमेंट आणि १५५ मिमी तोफांची ६ रेजीमेटस् इथं तैनात केल्यात. नुकतंच भारतीय सेनेच्या तोफखान्यानं पाकिस्तानातल्या अनेक पोस्ट नष्ट केल्या होत्या तसंच दहशतवादी कॅम्पलाही निशाण्यावर घेतलं होतं.