नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या मेरठ येथील रॅलीची सुरक्षा पाहणारी बोगस आयएफएस अधिकारी झोया खानला अटक करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे ती बोगस अधिकारी बनून निळ्या दिव्याच्या गाडीतून फिरत होती तसेच सरकारी सेवेचा लाभ घेत होती. तिचा वावर असा असायचा की कित्येक जिल्ह्यांचे पोलीस तिला पाहून सॅल्यूट ठोकायचे. पण याबद्दल कोणालाही कधी शंका आली नाही. हीची सत्यता जाणून घेण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2007 ला  झोया खानने आयएफएससाठी परीक्षा दिली पण ती पास झाली नाही असे तिने सांगितले. तिच्या या कारस्थानात पतीचाही सहभाग आहे. तिचे वडील डॉक्टर असून कानपूरच्या जॉईंट कमिशनरचा मुलगा निशांत सोबत तिचे लग्न झाले. निशांतनेच तिला आयएफएस बनण्यास मदत केल्याचेही समोर आले आहे. 


अटक झालेली झोया 2 वर्षांपासून खोटी अधिकारी म्हणून फिरतेय. पोलीसांच्या दोन गाड्या आणि निळ्या बत्तीच्या गाडीचा वापर करत असे. 
ही बोगस अधिकारी सर्वांच्या अंगावर डाफरत असे. नोएडा पासून गाझीयाबाद पर्यंत सर्वच पोलीस तिला घाबरत असतं. ती गाड्यांमधून उतरत असे मग पोलीस तिला सॅल्यूट करत. तिच्या अशा वागण्यामुळे पोलखोल होण्यास 2 वर्षे लागले. पोलिसांच्या ताफ्यात चालत असे. 28 मार्चला मोदींच्या मेरठ येथील रॅलीत झोया ही अधिकारी म्हणून फिरत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिला मेरठच्या रॅलीत पीएसओ सोबत दोन ठाण्यातून पोलीस देण्यात आले होते. 


एकदा नोएडाचे एसएसपी रेवल कृष्णा यांच्यावर झोया ओरडली. यानंतर तिची पोलखोल होण्यास सुरूवात झाली. रेवल कृष्णा यांना तिच्यावर शंका आली. त्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि ते तिच्या घरी गेले. तिच्या घरात जे लॅपटॉप सापडले त्यात पोलिसांना अफगाणिस्तान कनेक्शन सापडले आहे. पोलीस आता यासंदर्भात अधिक चौकशी करत आहे. 
तिला कोणता दुसरा अधिकारी मदत करत होता का ? ती कोणत्या दुसऱ्या देशासाठी काम करत होती का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.