श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयात नावेद नावाच्या एकदा संशयित दहशतवाद्यानं पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला. या केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झालेत. यातील एकाचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या श्री महाराजा हरीसिंग रुग्णालयात एक दहशतवाद्यानं केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसाचं एक पथक एकूण सहा दहशतवाद्यांना रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. त्यापैकी नावेद नावाच्या एकदा संशयित दहशतवाद्यानं पोलीसाच्या हातातील बंदूक हिसावून गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत.


 गोळीबारानंतर सगळ्याच कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न  केला. पण पोलिसांनी सहा पैकी पाच दहशतवाद्यांना ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं असून हल्ला करणारा नावेद तथा अबु हंजुला फरार झालाय. गोळीबारानंतर शहरात नाकेबंदी करण्यात आली आहे. नावेदला पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.