Jammu Dance Death Video : डान्स करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणाचा स्टेजवर डान्स करत असताना मृत्यू झाला आहे. तरूणाच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना जम्मू- काश्मीरमधील आहे. योगेश गुप्ता असं मृत तरूणाचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिश्नाहच्या कोठे सैनिया गावामध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान कलाकार योगेश गुप्ता हा देवी पार्वती म्हणून मंचावर परफॉर्म करत होता. डान्स करत असताना तो खाली कोसळतो, गाणं चालू असतं मात्र योगेशची हालचाल थांबलेली असते. काही वेळ कोणीच काही प्रतिसाद देत नाही. मात्र तरीही लोकांना वाटतं तोसुद्धा योगेशच्या सादरीकरणाचा भाग आहे. 


योगेशने काहीच हालचाल न केल्याने भगवान शंकराची वेशभूषा केलेला दुसरा कलाकार स्टेजवर येतो. त्याला बेशुद्धावस्थेत पाहून त्याला जागवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर योगेशला उपजिल्हा रुग्णालयात बिष्णा इथं नेण्यात येतं मात्र डॉक्टर त्याला तपासून मृत म्हणून घोषित करतात. 


 



दरम्यान, इतका तरूण कलाकार हे जग सोडून गेला आणि तिथे उपस्थित शेकडो लोकांना त्याची जाणीवही झाली नाही हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.