अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांची भाजपला सोडचिठ्ठी
भाजपला मोठा धक्का
इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते गेगांग अपांग यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. या सोबतच भाजपने जमिनीवर काम करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील आठवण त्यांनी यावेळी काढली.
गेगांग यांनी म्हटलं की, अटल बिहारी वाजपेयी नेहमी एकतेवर विश्वास ठेवत होते. वाजपेयीजी आमच्या देशाचे महान डेमोक्रेट होते. त्यांनी नेहमी आम्हाला स्वर्णिम सिद्धांत राजधर्म शिकवला. आज मी राजधर्माचं पालन करत आहे.' गेगांग अपांग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २२ वर्ष ते अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. गेगांग अपांग सगळ्यात अधिक वर्ष १९८० के १९९९ त्यानंतर २००३ ते २००७ दरम्यान ते मुख्यमंत्री होते.
नॉर्थ ईस्ट भागात भाजपचे पहिले मुख्यमंत्री गेगांग अपांग होते. त्यांनी म्हटलं की, 'मी हे पाहून निराश झालो की भाजपमध्ये आता स्वर्गीय वाजपेयी यांच्या सिद्धांतांचं पालन नाही होत. पक्ष आता सत्ता मिळण्याचा मार्ग बनला आहे. पक्ष आता अशा नेतृत्वात काम करतो आहे जे विकेंद्रीकरण किंवा लोकशाहीने निर्णय नाही घेत. ज्यासाठी पक्षाची स्थापना झाली तो उद्देश मागे पडला आहे.'
अपांग यांनी म्हटलं की, 'भाजप आणि केंद्र सरकार सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले आहे. नगा शांती वार्ता, चकमा-हाजोंग मुद्दा, नागरिकता बिल, दूरसंचार आणि डिजिटल कनेक्टिविटीसह बांग्लादेश, म्यांमार आणि चीन सारख्या शेजारील राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध स्थापित करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे.'
गेगांग अपांग यांना २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा तडजोड करुन भाजप नेतृत्वाने दिवंगत कलिखो पुल यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. त्यांनी म्हटलं की, 'सुप्रीम कोर्टाच्या एक प्रतिकुल निर्णयानंतरही भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. पुल यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी नाही केली गेली.' यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्यावर देखील टीका केली. माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग हे २०१४ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते.