नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील बोमजा गाव. या गावातील प्रत्येक कुंटुंब करोडपती आहे.


काय आहे यामागचे कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मु्ख्यमंत्री पेमा खांडू यांनी बुधवारी बोमजा गावतील प्रत्येक जमीनदाराला ४०,८०,३८,४०० रुपये नुकसान भरपाई दिली. या जमीनदारांच्या जमिनीवर भारतीय सेनेने कब्जा केला होता. त्याबदल्यात त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तवांग गैरीसन यांच्या प्रमुख स्थान योजनेसाठी २००,०५६ एकर जमिनीचा वापर करण्यात येईल.


 ३१ जमीन मालकांना नुकसान भरपाई


गावातील ३१ जमीन मालकांना ही रक्कम देण्यात आली आहे. सर्वात अधिक रक्कम ६,७३,२९,९२५ रुपये आहे. तर एकाला २,४४,९७,८८९ रुपयांचा चेक देण्यात आला आहे. अन्य २९ जणांना १,०९,०३,८१३ रुपयांचा चेक देण्यात आला आहे. ही रक्कम वाटल्यानंतर बोमजा गाव सर्वात श्रीमंत गावांपैकी एक झाले आहे, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.


मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले...


मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितले की, जमिनदारांच्या नुकसान भरपाईबद्दल केंद्र सरकारशी बातचीत चालू होती. खूप काळ रखडलेल्या या रक्कमेला मंजूरी दिल्याबद्दल रक्षामंत्री निर्मला सीतारमण यांचे त्यांनी आभार मानले.


यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...


पंतप्रधानांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मदतीने अरुणाचल प्रदेश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अरुणाचल प्रदेशाला रेल्वे, हवाई मार्ग, डिजीटल आणि रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यावर भर दिला जात आहे.