नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दक्षिणेतील सुपरस्टार आणि अभिनेता कमल हासन यांची भेट घेतली. चेन्नईमधील कमल हासन यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत आप नेता संजय सिंह हे सुद्धा उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी भ्रष्टाचार आणि देशातील सांप्रदायिकता यावर दोघांमध्ये चर्चा झाली. कमल हासन यांनी राजकारणात यावं अशी इच्छाही केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. कमल हासन गेल्या काही दिवसांत विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 


काही दिवसांपूर्वी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचीही भेट घेतली होती. दुसरीकडे आम आदमी पक्षाचा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोललं जात आहे. आपने काही दिवसांआधी शेतक-यांसाठी तामिळनाडूमध्ये आंदोलन केलं होतं.