मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असतात. मात्र नुकतीच त्यांनी बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागून एका जुन्या वादावर पडदा टाकला आहे.  


 काय होते प्रकरण ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मे 2016 साली अरविंद केजरीवाल यांनी मजिठिया यांच्यावर ड्रग समस्येवरून टार्गेट केले होते. केजरीवाल मजिठिया सोबतच त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणानंतर मजिठियांनी अरविंद केजरीवाल आणि  आपच्या दोन कार्यकर्त्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता.   


 केजरीवाल यांचे निवेदन   


 अरविंद केजरीवाल यांनी निवेदनाच्या मार्फत मजिठियांची माफी मागितली आहे. मजिठियांवरील आरोप आणि संबंधित विधानं ही राजकीय हेतूने केली होती. या आरोपातून काहीच उत्पन्न झाले नाही. त्यामुळे सारे आरोप मागे घेऊन  माफी मागतो असे केजरीवाल यांनी निवेदनामध्ये स्प्ष्ट केले आहे.   



 


 अवतार सिंह भडानांसोबतही विषय संपवला  


मागील वर्षी केजरीवाल आणि भाजप नेते  अवतार सिंह भडाना यांच्यामध्येही वाद झाला होता. तेव्हा देखील केजरीवाल यांनी माफी मागितली होती. 
2014  साली भडाना यांचा उल्लेख केजरीवाल यांनी भ्रष्टाचारी असा केला होता. याप्रकरणीदेखील केजरीवालांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यात आला होता.