नवी दिल्ली : बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला. राजदचे तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उपस्थिती लावली. यावेळी नितीश सरकारसोबत केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.