नवी दिल्ली: आम आदमी पक्ष (आप) आर्थिक गर्तेत सापडल्याने केजरीवाल कुटुंबीयांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या उभारणीसाठी मासिक वर्गणी द्यायची ठरवली आहे. दिल्लीत सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यावेळी पक्षातर्फे मासिक वर्गणी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी केजरीवाल यांनी म्हटले की, आगामी काळात त्यांच्या पत्नी, मुले आणि वडिलांकडून आम आदमी पक्षाला महिन्याला २५ हजारांची वर्गणी देण्यात येईल. 


आम आदमी पक्ष हा सध्या कंगाल झाला आहे, असे त्यांनी यावेळी वारंवार सांगितले. 


केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या तब्बल ४०० फाईल्स तपासल्या. आता सरकारने आम्हाला केवळ राफेल विमान खरेदी व्यवहाराची फाईल दाखवण्याचे धाडस करावे, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले. 


'आप' हे गेल्या ७० वर्षातील दिल्लीतील आतापर्यंतचे सर्वात प्रामाणिक सरकार आहे.  आमच्या पक्षाचे कार्यकर्ते भाजप आणि काँग्रेसचा प्रामाणिकपणे सामना करत आहेत. या सगळ्यामुळे दिल्लीकरांची छाती ५६ इंचाने नव्हे तर ६० इंचांनी फुगली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.