Boy Dancing Like Snake: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. या व्हिडिओमुळे अनेकांचे मनोरंजन होत असते. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतात. विशेषत: सापांचे व्हिडिओ. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. 



नेमकं झालं तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सापावर नियत्रंण मिळवण्यासाठी पूर्वी गारुडी पुंगीचा वापर करायचे तसंच काहीसं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दुकानासमोर पुंगी वाजवत असल्याचे दिसत आहे. काहीक्षणातच दुकानाच्या आतून एक असा साप बाहेर आला की सर्वजण आश्चर्यचकित झाले. या सापानं लोकांवर हल्ला देखील केला आहे असं त्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 


 


व्हिडिओ पाहा.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


व्हिडिओत काय?


या व्हिडिओत एक गारुडी दुकानासमोर पुंगी वाजवून सापाला बोलावत आहे. काही क्षणानंतर दुकानाच्या आतून एक साप बाहेर येतो. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल कारण हा साप नसून चक्क एक माणूस पुंगीच्या तालावर डोलताना दुकानातून बाहेर येत आहे. ती व्यक्ती सापाची अॅक्टींग करत दुकानाबाहेर येते. बाहेर येताच जो गारुडी सापाची पुंगी वाजवत होता त्यावर ती हल्ला करते. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.  सापांचे अनेक व्हिडिओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


हे व्हिडिओ जरी माहितीपूर्ण नसले तरी या व्हिडिओमुळे तुमचे मनोरंजन नक्की होऊ शकते. हा व्हिडिओ इंन्सटग्रामवर एका यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ कोणत्या शहरातला किंवा राज्यातला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.