Coronavirus: देशात 24 तासात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले की आरोग्य यंत्रणेला धडकी भरली; पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक
Coronavirus India: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 24 तासात 334 नवीन रुग्णांचं निदान झाले. मुंबईत सर्वाधिक 361 तर, ठाण्यात 314 रूग्ण आढळले आहेत.
Coronavirus India: सर्वांचेच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता आकडेवारी धडकी भरवणारी आहे. देशात 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे (Coronavirus India). देशात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तातडीने बैठक घदतेली. या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य यंत्रणेबाबत आढावा घेण्यात आला.
आरोग्य यंत्रणा आणि सुविधांचा पंतप्रधान मोंदीनी आढावा घेतला
पुन्हा एकदा देशात कोरोनानं डोकं वर काढ आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंदर्भात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत देशातल्या आरोग्य यंत्रणा आणि सुविधांचा आढावा घेण्यात आला. देशात सध्या दररोज कोरोनाचे हजारच्या वर रुग्णांचं निदान होतंय. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेतली.
झपाट्याने वाढतेय कोरोना रुग्णसंख्या
देशात कोरोनानं पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली. झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 134 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजारांवर गेली आहे. यातील सर्वाधिक 125 रुग्ण महाराष्ट्रात, 106 रुग्ण गुजरातमध्ये तर 61 रुग्ण दिल्लीतील आहेत.
महाराष्ट्रातही वाढतेय रुग्णसंख्या
राज्यात कोरोनाच्या 334 नवीन रुग्णांचं निदान झाले आहे. सध्या राज्यात एकूण 1,648 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक 361 त्यानंतर ठाण्यात 314 रूग्ण आहेत. रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगानं होऊ लागल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असं आवाहन आरोग्य विभागानं केले आहे.