गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7.12 लाख लोक पुराच्या विळख्यात आहेत. अहवालानुसार 80036.90 हेक्टर पीक जमीन आणि 2251 गावे अजूनही पाण्याखाली आहेत. दरम्यान, आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी थोडी सुधारली आहे. परंतु नागाव, होजई, कछार आणि दारंग जिल्ह्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. तर पुराच्या पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागाव जिल्ह्यात 3.36 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर कचर जिल्ह्यात 1.66 लाख, होजईमध्ये 1.11 लाख आणि दररंग जिल्ह्यात 52,709 लोक प्रभावित झाले आहेत. कचर, लखीमपूर आणि नागाव जिल्ह्यात शुक्रवारी दोन मुलांसह चार जण पुराच्या पाण्यात बुडाले, पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १४ झाली आहे.


अनेक गावे अजूनही पाण्यात अडकली आहेत


अहवालानुसार, 80036.90 हेक्टर पीक जमीन आणि 2,251 गावे अजूनही पाण्याखाली आहेत. एकूण 74705 पूरग्रस्त लोक सध्या जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या 234 मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. एकूण 80,036.90 हेक्टर पीक जमीन आणि 2,251 गावे अजूनही पाण्याखाली आहेत. सध्या जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या 234 मदत छावण्यांमध्ये 74705 पूरग्रस्त लोक राहत आहेत.


राहुल गांधींनी मदतीचे आवाहन केले


याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विट करून हे आवाहन केले. आसाममधील पुरामुळे लाखो लोक बाधित झाल्याचं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बचाव आणि मदत कार्यात सर्वतोपरी मदत करत राहण्याचे आवाहन करतो.


आपत्कालीन विमानसेवा सुरु झाली


आसाम मंत्रिमंडळाने सिलचर आणि गुवाहाटी दरम्यान आपत्कालीन विमान सेवा सुरg करण्याचा निर्णय घेतला आहे. दिमा हासाओ आणि बराक खोऱ्यात पूर आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेले दळणवळणाचे संकट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सिलचर ते गुवाहाटी दरम्यान सुरु करण्यात आलेल्या आपत्कालीन विमानासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील. राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण 7,17,046 लोक बाधित झाले आहेत.